पथकांमध्ये 9000 लखनऊ: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिकाकपूर हिला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने १०० अतिरिक्त पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये सुमारे १००० सदस्य काम करत आहेत. कनिका ११ मार्चनंतर कुणाकुणाच्या संपर्कात आली याचा शोध ही १०० पथके घेणार आहेत. कनिकान आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा या पथकांचा प्रयत्न आहे. कनिकाच्या घराच्या आसपास राहणारे लोक, तसेच तिला घरीभेटायला आलेल्या सर्व लोकांचा शोध ही पथके घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार आम्ही सतत काम करत आहोत. जो स्कॅनिंगच्या कामात बाधा आणेल किंवा पथकांना सहकार्य करणार नाही अशांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी अमरसिंह पाल यांनी सांगितले. २२ हजार लोकांची स्क्रीनिंग शनिवारी पथकाने कनिकाच्या घराच्या आसपास राहणाऱ्या सुमारे २२ हजार लोकांची स्क्रीनिंग केली. तसंच पार्टीचे आयोजन करणारे आदिल अहमद आणि अदीश सेठ याच्या घराला सॅनिटाइइड करण्यात आले आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली. कनिकाच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी ४८ तास घराबाहेर पडू नये, तसेच कुणालाही त्यांनी घरात घेऊ नये, असे सांगण्यात आल्याचेही सिंह म्हणाले. करताहेत काम सीसीटीव्ही फुजेटची पाहणी तज्ज्ञाचे एक पथक कनिका ज्या पंचतारांकित हॉटेलात राहिली होती, त्या हॉटलातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम करत आहे. कनिकाने हॉटेलात बुफेमध्ये जेवण केले, असे एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. त्यावेळी कनिका अनेक पाहुण्यांना भेटली होती. कनिका ज्या वेळी हॉटेलात थांबली होती. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघही तिथेच थांबला होता. कनिकाने हॉटेलमध्ये आयोजित एका वृत्तवाहिनीच्या वार्षिक संमेलनात भाग घेतला होता, अशीही माहिती उघड होत आहे. हे पाहता कनिकाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांच्या नावाची यादी तयार करणे गरजेचे असत्यार्चएका अधिकाऱ्याने सांगितले. ___ मुंबईच्या विमानतळावर कनिका कपूर हिची व्यवस्थित स्क्रीनिंग झाली होतीका, हे पाहण्यासाठी आम्ही मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती लखनऊचे पोलिस आयुक्त | सुजीत पांडे यांनी सांगितले.
कनिका आणि करोना: 900 पथकांमध्ये 9000 लोक करताहेत काम