छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी


पणजी, १९ फेब्रुवारी - हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे लिखाण असल्याचे उघड झाले, हे अतिशय संतापजनक आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अमाच्या राजांविषयी असा खोटा इतिहास कोणीही हिंदु सहन करणार नाही. हे इतिहासाचे पुस्तक शासनाने त्वरित मागे घ्यावे अन्यथा समस्त शिवप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज अमाच्या राजांविष्या हिंदू सहन माहे. त्यामध्ये गाडण्यात आली सोलंकी यांनी दिली आहे. गोवा शासनाच्या इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाला एक पुरवणी 'गोव्याचा इतिहास' या नावाखाली जोडण्यात आली आहे. त्यामध्ये गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करून सलग तीन दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिला यांना डांबून ठेवले आणि काहींना ठारही मारले, असे धादांत खोटे अन् छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा मलीन करणारे लिखाण केले आहे. 'परस्त्री मातेसमान' या धर्मवचनानुसार वागणार्या आणि शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानपूर्वक परत पाठवणार्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर अशा प्रकारे चिखलफेक करणे, हा एक मोठा अपराधच आहे. त्यामुळे असे लिखाण करणारे केले धर्मवचनानुसार वायांनाही कारखा त्यांच्यावर त्वरीत काल लेखक आणि ते पाठ्यपुस्तकात समावेश करणारे संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. सोलंकी यांनी या वेळी केली. हे पहिल्यांदाच होत नसून २००८ मध्ये देखील अशाच एन.सी. ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकात छ. शिवरायांचा अपमान करण्यात आला होता, त्याविरोधात तीव्र आंदोलन केल्याने शासनाने ते पुस्तक मागे घेतले होते. शासनाने आताही या पुस्तकाची पुरवणी मागे घेतली नाही, तर पुन्हा त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असेही डॉ. सोलंकी यांनी सांगितले. या प्रकरणी त्वरीत कारवाई करावी, यासाठी आज दुपारी १२ वा. गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांची शिवप्रेमी संघटनांच्या शिष्टमंडळाने गंभीर आहे. येत्यानी 'हा विषय भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी शिक्षण संचालकांनी हा विषय गंभीर आहे. येत्या अभ्यासक्रमात हा भाग त्वरीत वगळू, तसेच अन्य कोणत्याही पाठ्यक्रमात असे काही आढळल्यास आम्हाला कळवा, त्यावरही कारवाई करू', असे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि सौ. शांती मामलेदार, 'स्वराज्य गोमंतक'चे प्रमुख श्री. प्रशांत वाळके आणि श्री महेश शिरगावकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. भाई पंडीत, शिवप्रेमी श्री. मयुरेश कुष्टे, पर्वरी येथील धर्मप्रेमी श्री. केशव चोडनकर, तसेच श्री. जयेश थाळी, श्री दयानंद गावकर, श्री. अंकुश नाईक आदी उपस्थित होते.