लातूर : मुंबई मोटार वाहन कर कायदा १९५८ अन्वये देय कर आणि त्यावरील देय व्याज, भरणात आलेले नाही व त्या कारणाने ज्याअर्थी यांच्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकी वसूल/जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूली योग्य असलेल्या रकमेच्या मागणी प्रित्यर्थ येथे असलेल्या रक्कमेच्या कार्यालया मार्फत खाली विनिर्दिष्ठ केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आली होती. विक्री करिता या मध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी देय रक्कम संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात भरण्यात आली नाही. तर उक्त मालमत्ता प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांच्या आवारात येथे दिनांक २७ जानेवारी मार्फत लिलाव २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता किंवा वाजण्याच्या सुमारास जाहिर लिलावाव्दारे विकण्यात येईल. अशा त-हेने केलेली कोणतीही विक्री कायम होण्यास अधिन राहील असे महसुल वसुली अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अटकावून ठेवलेल्या वाहनांचा प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत लिलाव